मुंबई - वेस्ट इंडिजचा कर्णधार केरॉन पोलार्डने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामन्यात एका षटकात ६ षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अकीला धनंजय याच्या गोलंदाजीवर हा कारनामा केला. त्यांच्या या खेळीच्या जोरावर विंडीजने टी-२० सामना ४१ चेंडू आणि ४ गडी राखून जिंकला. पोलार्डने या सामन्यात ११ चेंडूत ३८ धावांची तुफानी खेळी केली. दरम्यान, पोलार्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात ६ षटकार ठोकणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. तसेच टी-२० त असा कमाल करणारा तो पाचवा खेळाडू ठरला. पोलार्डच्या आधी टी-२० क्रिकेटमध्ये एका षटकात ६ षटकार ठोकण्याचा पराक्रम चार खेळाडूंनी केला आहे. वाचा कोण आहेत ते खेळाडू...
टी-२० क्रिकेट प्रकारात एका षटकात ६ षटकार ठोकणारे खेळाडू -
- युवराज सिंह (भारत) विरुद्ध स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड), २००७
- रॉस व्हाइटली (वॉस्टरशायर) विरुद्ध कार्ल कार्वर (यॉर्कशायर), २०१७
- हजरतुल्लाह जजई (काबुल जवान) विरुद्ध अब्दुल्ला मजारी (बल्ख लीजेंड), २०१८
- लियो कार्टर (कँटरबरी नाइट्स) विरुद्ध एंटोन डेविच (नोर्थें डिस्ट्रिक्ट), २०२०