महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

“खेळाडूंना चार्टर्ड फ्लाईटवरून आणा, पण वर्ल्डकप खेळवा” - brad hogg about crickters in t20 wc news

हॉगने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, की स्पर्धा पुढे ढकलणे किंवा रद्द करणे या विचाराच्या मी विरोधात आहे. स्पर्धेचे सुरळीत आयोजन करण्यासाठी आयोजकांना वेळेत काही आवश्यक पावले उचलावी लागतील.

Players to be brought from charter plane for T20 World Cup said brad hogg
“खेळाडूंना चार्टर्ड फ्लाईटवरून आणा, पण वर्ल्डकप खेळवा”

By

Published : Apr 15, 2020, 6:37 PM IST

मेलबर्न - “ऑस्ट्रेलियामध्ये यावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. खेळाडूंना जरी चार्टर्ड फ्लाईटवरून आणण्याची गरज भासली तरी, त्यांना कोरोनाची चाचणी करून आणले पाहिजे”, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगने मांडले आहे. कोरोनामुळे जगभरात एक लाख २० हजाराहून अधिक लोकांचा बळी गेला आहे आणि बर्‍याच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.

हॉगने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, की स्पर्धा पुढे ढकलणे किंवा रद्द करणे या विचाराच्या मी विरोधात आहे. स्पर्धेचे सुरळीत आयोजन करण्यासाठी आयोजकांना वेळेत काही आवश्यक पावले उचलावी लागतील. बरेच खेळाडू लॉकडाऊनमधून जात आहेत. हे खेळाडू वर्ल्डकपसारख्या स्पर्धांसाठी तयारी करण्यास सक्षम नाही. म्हणून आम्हाला त्यांना दीड किंवा दोन महिन्यांपूर्वी येथे आणायचे आहे.

यंदा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान टी-२० वर्ल्डकप होणार आहे. मात्र, या स्पर्धेवर कोरोनाचे सावट आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details