लंडन - सध्या इंग्लंड आणि वेल्समध्ये आयसीसी वनडे विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा मोठ्या दिमाखात चालू आहे. या स्पर्धेत सर्वच संघ २ गोष्टींपासून हैराण आहेत, त्या म्हणजे खेळाडूंना होणारी दुखापत आणि सामन्यादरम्यान येणारा पावसाचा व्यत्यय. पावसाच्या व्यत्ययामुळे आतापर्यंत ४ सामने रदद् करण्यात आले आहेत. तर आतापर्यंत वेगवेगळ्या देशांचे ३ खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. तर जाणून घेऊयात या विश्वकरंडक स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर गेलेल खेळाडू...
शिखर धवन (भारत) -भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. धवन विश्वकरंडक स्पर्धेसाठी फिट नसून त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागणार आहे. त्यामुळे तो स्पर्धेतून माघार घेत असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. विश्वकरंडकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखरच्या डाव्या आंगठ्याला दुखापत झाली होती. धवनच्या जागेवर भारतीय संघात युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची वर्णी लागली आहे.