दुबई - इंग्लंडचा माजी दिग्गज क्रिकेटपटू केविन पीटरसनने आयपीएल २०२० च्या समालोचक टीममधून माघार घेतली आहे. तो युएईमधून स्पर्धा अर्ध्यात सोडून मायदेशी इंग्लंडला परतला आहे. ४० वर्षीय पीटरसनने मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी समालोचक टीम सोडली असल्याचे सांगितले आहे.
पीटरसनने याची घोषणा ट्विटच्या माध्यमातून केली आहे. मी आयपीएलमधून माघार घेत आहे. कारण मला माझ्या मुलांसोबत वेळ व्यतीत करावयाचा आहे. २०२० हे वर्ष वेगळेच ठरले आहे, माझी मुलं सद्या कोरोनामुळे शाळेला जात नाहीत. त्यांच्यासोबत मला वेळ घालवायचा आहे, असे पीटरसनने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.