मेलबर्न- ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीटर सिडलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सिडलने वयाच्या ३५ व्या वर्षी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. त्याने न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटी लढतीपूर्वी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, सिडलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी स्थानिक स्पर्धांमध्ये तो खेळणार आहे.
न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेसाठी पीटर सिडलची निवड करण्यात आली होती, मात्र त्याला अंतिम ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे तिसऱ्या लढतीसाठी संघ निवडीपूर्वीच सिडल याने निवृत्तीचा निर्णय घेतला. निवृत्तीचा निर्णय घेण्यापूर्वी कर्णधार टीम पेन आणि प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्याशी आपण चर्चा केली होती, असे सिडलने स्पष्ट केले आहे.
आपल्या निवृत्ती विषयी सिडल म्हणाला, 'क्रिकेटमध्ये कधी थांबायचे आणि कोणती वेळ योग्य हे कळणे अवघड आहे. पण माझे मुख्य उद्दिष्ठ अॅशेस मालिका खेळणे आणि जिंकणे होते.