लाहोर -पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने विरोधकांवर निशाणा साधत असे म्हटले आहे, की ते त्यांच्या फायद्यासाठीच मला लक्ष्य करतात. माजी सलामीवीर आमिर सोहेलच्या विधानानंतर अक्रमने हे विधान केले आहे. 1992 मध्ये अक्रममुळे पाकिस्तान विश्वचषक जिंकू शकला नव्हता, असे सोहेलने म्हटले होते.
सोहेलला उत्तर देताना अक्रम म्हणाला, "माझ्याविरूद्ध नकारात्मक गोष्टी ऐकल्यावर मी निराश होतो. मी 17 वर्षांपूर्वी निवृत्त झालो, परंतु लोक अद्याप त्यांच्या फायद्यासाठी माझे नाव वापरतात."