महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

शेतकरी आंदोलनाचे पडसाद ऑस्ट्रेलियातही; भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान करण्यात आली पोस्टरबाजी - भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान पोस्टरबाजी

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान मेलबर्नच्या मैदानाबाहेर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याकरीता पोस्टरबाजी करण्यात आली.

people-support-to-farmer-agitation-during-the-india-australia-test-match-in-melbourne
शेतकरी आंदोलनाचे पडसाद ऑस्ट्रेलियातही; भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान करण्यात आली पोस्टरबाजी

By

Published : Dec 26, 2020, 7:04 PM IST

मेलर्बन -दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद ऑस्ट्रेलियातही दिसून आले. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान मेलबर्नच्या मैदानाबाहेर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याकरीता शेकडो भारतीय नागरिक जमले होते.

कृषी कायद्याविरोधात पोस्टरबाजी -

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आता ऑस्ट्रेलियातही पाठींबा मिळताना दिसून येत आहे. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान मेलबर्नच्या मैदानाबाहेर शेकडो भारतीय नागरिकांनी शेतकऱ्यांना पाठींबा देत कृषी कायद्याविरोधात पोस्टरबाजी केली. ऑस्ट्रेलियन पत्रकार पीटर लालोर यांनी या आंदोलनाचा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

दरम्यान, मेलबर्न मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान दुसरा कसोटी सामना सुरु आहे. बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बुमराह, सिराज आणि अश्विनच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर संपुष्टात आला आहे.

हेही वाचा - इथियोपियाची गृहयुद्धाच्या दिशेने वाटचाल.. देश अधोगतीच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details