महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

''पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मदत करा'', वकारने केली विनंती - waqar younis on coronavirus news

वकारने बुधवारी ट्विटरद्वारे ही विनंती केली आहे. तो म्हणाला, "आपला देश या क्षणी कठीण अवस्थेतून जात आहे. अशा प्रकारच्या साथीनंतर अर्थव्यवस्था जमिनीवर येते आणि पाकिस्तानच्या बाबतीतही असे घडले आहे. आपणास हे देखील माहीत आहे, की आपला देश आधीच कर्जात बुडालेला आहे.''

People of pakistan should help Prime Minister Imran khan said waqar younis
''पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मदत करा'', वकारने केली विनंती

By

Published : Apr 22, 2020, 10:03 PM IST

इस्लामाबाद - पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनूसने आपल्या देशवासियांना पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोना विषाणू विरूद्धच्या लढाईत मदत करण्याची विनंती केली आहे. वकारने लोकांना पंतप्रधान सहायता निधीत अधिकाधिक देणगी देण्यास सांगितले.

वकारने बुधवारी ट्विटरद्वारे ही विनंती केली आहे. तो म्हणाला, "आपला देश या क्षणी कठीण अवस्थेतून जात आहे. अशा प्रकारच्या साथीनंतर अर्थव्यवस्था जमिनीवर येते आणि पाकिस्तानच्या बाबतीतही असे घडले आहे. आपणास हे देखील माहीत आहे, की आपला देश आधीच कर्जात बुडालेला आहे.''

"त्यांना पाठिंबा देण्याची आपली जबाबदारी आहे जेणेकरून आपला देश पुन्हा आनंदी होऊ शकेल. आपल्याला त्यांचे समर्थन करण्याची गरज आहे'', असेही वकारने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details