लाहोर - कोरोनामुळे संकटात सापडलेल्या प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आणि इतर सर्व भागधारकांना पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मदत करणार आहे. या कठीण काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंबरोबरच अधिकारी, स्कोरर आणि ग्राउंड कर्मचार्यांनाही मदत करणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे. मंडळाने चालू आर्थिक वर्षात यासाठी निधीची तरतूद केली आहे.
क्रिकेटपटू, सामनाधिकाऱ्यांना मदत करणार पीसीबी - pcb on cricketer, match officials and ground staff news
प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना २५ हजार पाकिस्तानी रुपये, सामनाधिकाऱ्यांना १५ हजार पाकिस्तानी रुपये आणि स्कोअर आणि ग्राउंड स्टाफला १० हजार पाकिस्तानी रुपये देण्यात येणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे. यासाठी त्यांना ४ ते १४ मे दरम्यान पीसीबीशी संपर्क साधावा लागेल.
पीसीबीने एका निवेदनात म्हटले आहे, की पीसीबी २०१८-१९ हंगामात भाग घेणाऱ्या आणि पाच हंगामात कमीतकमी १५ प्रथम श्रेणी सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना मदत करणार आहे. शिवाय, मागील दोन मोसमात पीसीबी स्पर्धांमध्ये आपली भूमिका बजावणाऱ्या सामनाधिकारी आणि स्कोररनाही लाभ मिळणार आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना २५ हजार पाकिस्तानी रुपये, सामनाधिकाऱ्यांना १५ हजार पाकिस्तानी रुपये आणि स्कोअर आणि ग्राउंड स्टाफला १० हजार पाकिस्तानी रुपये देण्यात येणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे. यासाठी त्यांना ४ ते १४ मे दरम्यान पीसीबीशी संपर्क साधावा लागेल.
TAGGED:
pcb latest news