लाहोर -पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली त्याच्या पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे. हसनने गेल्या आठवड्यात व्हर्च्युअल रिहॅब सत्र केले होते. त्यानंतर, हसनवर कदाचित शस्त्रक्रियेची आवश्यकता नसेल आणि लवकरच तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परत येईल, असे डॉक्टरांनी सांगितले.
यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हसनला आर्थिक मदतीचा हात देणार आहे. केंद्रीय करारातून वगळल्यामुळे पीसीबी हसनला ही मदत करणार आहे. पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वसीम खान म्हणाले, "हसन अली हा आमचा वारसा आहे आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017चा नायक आहे. या कठीण काळात त्याची काळजी घेणे पीसीबीची जबाबदारी आहे, जेणेकरून तो आपल्या तंदुरुस्तीवर काम करू शकेल."