कराची -पाकिस्तानचा डावखुरा फिरकी गोलंदाज रझा हसनला कोरोनासंबंधित प्रोटोकॉल तोडल्यामुळे देशाच्या स्थानिक हंगामाच्या उर्वरित सामन्यांमधून वगळण्यात आले आहे. बोर्डाच्या वैद्यकीय पथकाच्या परवानगीशिवाय स्थानिक हॉटेलमध्ये गेल्यामुळे आणि जैव सुरक्षित वातावरणाचे नियम तोडल्यामुळे रझा हसनला ही शिक्षा मिळाली. हंगामाच्या इतर कोणत्याही सामन्यात तो खेळू शकणार नाही.
हेही वाचा -पाकिस्तानच्या खेळाडूने मोडला कोरोना प्रोटोकॉल, मिळाली 'जबर' शिक्षा
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) नदीम खान यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ''कोरोनासंबधित प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याचे महत्त्व बर्याचदा सांगितले गेले आहे. शिवाय, जनजागृती मोहीम राबवली गेली आहे, परंतु रझा हसनने उल्लंघन केले. त्यामुळे रझा हसनला स्पर्धेतून वगळण्यात आले आहे. यापुढे त्याला उर्वरित हंगामात खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही."