कराची - पाकिस्तान सुपर लीगच्या सहाव्या हंगामात ६ खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. यामुळे ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय पाकिस्तान बोर्डाने घेतला. आता पाकिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी पीसीबीने एक योजना आखली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी ३० सदस्यीय खेळाडूंचा संघ पाठवण्याचा विचारात आहे. याची माहिती पीसीबीमधील सूत्रांनी दिली.
पीसीबीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंना व्यवसायिक विमानाऐवजी चार्टर्ड विमानाने आफ्रिकेला पाठवण्यात येणार आहे. पीएसएलमध्ये खेळाडूंना कोरानाची लागण झाल्याचे समोर आल्याने, पीसीबी अधिक जोखीम पत्कारण्याच्या फंदात नाही.