महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पीसीबीची क्रिकेटपटूंसाठी ऑनलाईन फिटनेस टेस्ट सुरू - PCB launches online fitnes test news

या चाचण्या पीसीबीचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच यासिर मलिक यांनी तयार केल्या आहेत. तर, संघाचे मुख्य प्रशिक्षक व मुख्य निवडकर्ता मिसबाह-उल-हक यांच्या मार्गदर्शनाखाली ही चाचणी घेण्यात येत आहेत.

PCB launches online fitness test for players
पीसीबीची क्रिकेटपटूंसाठी ऑनलाईन फिटनेस टेस्ट सुरू

By

Published : Apr 20, 2020, 10:44 PM IST

कराची -कोरोना लॉकडाऊन दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आपल्या केंद्रीय करारातील खेळाडूंसाठी 'ऑनलाईन फिटनेस टेस्ट प्रोग्राम' सुरू केला आहे. पीसीबीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की हॅरिस सोहेल, हसन अली, मुहम्मद अब्बास, असद शफीक, सरफराज अहमद, इमाद वसीम आणि शादाब खान यांच्या चाचण्या सोमवारी घेण्यात आल्या, तर उर्वरित खेळाडूंची चाचणी मंगळवारी घेण्यात येईल.

या चाचण्या पीसीबीचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच यासिर मलिक यांनी तयार केल्या आहेत. तर, संघाचा मुख्य प्रशिक्षक व मुख्य निवडकर्ता मिसबाह-उल-हकच्या मार्गदर्शनाखाली ही चाचणी घेण्यात येत आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) पंतप्रधान निधीमध्ये एक कोटींपेक्षा जास्त (१०,५३६,५०० पाकिस्तानी रुपये) रुपयांची मदत दिली आहे. देशातील कोरोना व्हायरस विरूद्ध सुरू असलेल्या लढ्यात हातभार लावत पीसीबीने आपले योगदान दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details