कराची -पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक खेळाडू सरफराज अहमद एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. त्याने कायदे-आझम स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान, आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून सामन्याच्या फी मधील ३५ टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली आहे.
सरफराज अहमद स्थानिक स्पर्धेत सिंध एकादश संघाचे नेतृत्व करत आहेत. शनिवारी झालेल्या सामन्यादरम्यान, त्याने आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. ही बाब समोर आली. यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सरफराजने आपली चूक मान्य केली आहे.