महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिले ‘इतके’ कोटी - पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लेटेस्ट न्यूज

केंद्रीय करारातील खेळाडू आपत्कालीन मदत निधीमध्ये त्यांचे सामूहिक योगदान देतील, असे २५ मार्च रोजी पीसीबीने जाहीर केले होते. पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी म्हणाले, की कोरोना विरुद्धच्या लढाईतील योगदानाबद्दल मी पीसीबीच्या सर्व केंद्रीय करार, खेळाडू आणि कर्मचार्‍यांचे आभार मानतो.

PCB donated in the war against Coronavirus
कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिले ‘इतके’ कोटी

By

Published : Apr 18, 2020, 4:13 PM IST

लाहोर - पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) पंतप्रधान निधीमध्ये एक कोटींपेक्षा जास्त (१०,५३६,५०० पाकिस्तानी रुपये) रुपयांची मदत दिली आहे. देशातील कोरोना व्हायरस विरूद्ध सुरू असलेल्या लढ्यात हातभार लावत पीसीबीने आपले योगदान दिले आहे.

केंद्रीय करारातील खेळाडू आपत्कालीन मदत निधीमध्ये त्यांचे सामूहिक योगदान देतील, असे २५ मार्च रोजी पीसीबीने जाहीर केले होते. पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी म्हणाले, की कोरोना विरुद्धच्या लढाईतील योगदानाबद्दल मी पीसीबीच्या सर्व केंद्रीय करार, खेळाडू आणि कर्मचार्‍यांचे आभार मानतो.

पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत १४० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७४०० प्रकरणांची पुष्टी झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details