कराची -पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) मुख्य कार्यकारी वसीम खान पीसीबी कल्याण निधीसाठी 15 लाख पाकिस्तानी रुपयांची मदत देणार आहेत. पाकिस्तानचे माजी सैनिक, सामनाधिकारी, स्कोअर आणि ग्राउंड स्टाफ यांना मदत करण्यासाठी खान यांनी हा निर्णय घेतला आहे.
वसीम खान म्हणाले, “मी वैयक्तिकरित्या देणगी देण्याचे ठरवले आहे. ही मदत सामनाधिकारी, स्कोअर आणि ग्राउंड स्टाफ यांना फायदेशीर ठरेल. हे छोटेसे योगदान अध्यक्ष कल्याण निधी आणि त्यास सहाय्य करण्यासाठी आहे. या कठीण आर्थिक परिस्थितीत खेळाडू, सामनाधिकारी, स्कोअर आणि ग्राउंड स्टाफ यांना जास्तीत जास्त पाठिंबा देण्याच्या दिशेने आपण एकजुटता दाखवली पाहिजे. "