मेलबर्न - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्स इंडियन प्रीमिअर लीगच्या लिलाव इतिहासात सर्वात महागडा ठरला. त्याला कोलकाता नाइट रायडर्सने १५.५ कोटी रुपयांची बोलीवर संघात सामिल केले. पण कमिन्सला आयपीएलमधून मिळणारे पैसे कसे खर्च करावे, हा प्रश्न पडला आहे.
कमिन्स सध्या न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. यादरम्यान, त्याला आयपीएलमध्ये मिळणारी रक्कम कशी खर्च करणार असे विचारले असता त्यानं सांगितलं की, ''मी काय करणार हे मला माहित नाही. पण माझी गर्लफ्रेंड मला म्हणाली की आम्ही आता आमच्या कुत्र्यासाठी जास्त खेळणी घेऊ शकतो. तिचं ठरलंय.'