नवी दिल्ली - माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने क्रिकेटच्या सर्व प्रारूपांतून निवृत्ती घेतली. आता तो 'टँलेट स्काऊट' म्हणून आयपीएलचा गतविजेता संघ मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. ''पार्थिव आता संघाच्या कोचिंग स्टाफ आणि स्काऊट ग्रुपसोबत काम करेल'', असे मुंबईने सांगितले. २०१५ ते २०१७ या काळात पार्थिव मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. त्याच्या काळात दोन्ही वेळा संघाने जेतेपद जिंकले.
हेही वाचा -इंग्लंडच्या भारत दौऱ्याची घोषणा, पुण्यात रंगणार तीन सामने
३५ वर्षीय पार्थिव म्हणाला, "मी मुंबई इंडियन्सकडून माझ्या क्रिकेटचा आनंद लुटला आहे. आता माझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करण्याची वेळ आली आहे. या संधीबद्दल मी मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाचा आभारी आहे.''
मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी म्हणाले की, मुंबई इंडियन्समध्ये खेळताना आम्ही त्याच्या क्रिकेटबद्दलच्या बुद्धीमत्तेला जाणले. आमच्या स्काऊटिंग सिस्टममध्ये वाढ करण्याच्या त्याच्या योगदानाबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. पार्थिव आमची विचारसरणी समजतो. "