गुजरात - भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल त्याच्या वडीलांच्या आजाराने अस्वस्थ झाला आहे. त्याने सोशल मीडियावर त्याच्या वडीलांच्या आजाराची माहिती दिली. तसेच टि्वट करत लोकांना भावूक अपील केली आहे.
वडील आजारी असल्याने पार्थिव अस्वस्थ, लोकांना भावुक अपील - फलंदाज पार्थिव पटेल
गेल्या अनेक दिवसांपासून पार्थिव संघाबाहेर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याची निवड झाली होती. मात्र, त्याला अंतिम अकरा जणाच्या संघात स्थान देण्यात आले नाही. त्याने त्याचा शेवटचा कसोटी सामना २०१८ मध्ये आणि २०१२ मध्ये एकदिवसीय सामना खेळला होता.
भारतीय संघातून एक वर्ष बाहेर असलेल्या ३३ वर्षीय यष्टीरक्षक पार्थिवने लिहिले आहे की, माझ्या वडीलांसाठी प्रार्थना करा. ते ब्रेन हॅमरेज या आजाराने ग्रस्त आहेत. भारतीय संघाकडून पार्थवने २५ कसोटी आणि ३८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने १० हजार ७७२ धावा केल्या. पार्थिवच्या नेतृत्वाखाली गुजरातने २०१६-१७ साली रणजी चषक जिंकला होता.