मुंबई -भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने आज बुधवारी क्रिकेटच्या सर्व प्रारूपांतून निवृत्ती जाहीर केली. ३५ वर्षीय पार्थिवने भारताकडून २५ कसोटी, ३८ एकदिवसीय आणि २ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे ९३४, ७३६, ३६ धावा केल्या आहेत.
पार्थिव पटेलने आज आपल्या १८ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला अलविदा केला. पार्थिवने वयाच्या केवळ १७व्या वर्षी (१७ वर्ष, १५३ दिवस) २००२ साली इंग्लंडविरुध्दच्या कसोटी सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केले होते. इतक्या कमी वयात भारताकडून आतंरराष्ट्रीय सामना खेळणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला.
हेही वाचा -IND vs AUS ३rd T२० : शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर 12 धावांनी विजय