मुंबई- कोरोनाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला असून, आगामी काळात होणार्या सर्व स्पर्धा स्थगित किंवा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरावासाठी अधिक वेळ बाहेर राहणार्या खेळाडूंना आता घरीच थांबावे लागले आहे. भारतीय संघाचे अष्टपैलू खेळाडू हार्दिक आणि कृणाल पांड्या सद्या घरीच आहे. लॉकडाऊन काळात कृणालने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
कृणालने शेअर केलेल्या व्हिडिओत, तो हार्दिकसोबत घरामध्ये क्रिकेट खेळताना दिसत आहे. यासोबत तो लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नका, असे आवाहन करताना दिसत आहे.
व्हिडिओच्या माध्यमातून पांड्या ब्रदर्स म्हणतात, की 'सुरक्षित राहा. घराबाहेर पडू नका. आम्ही आमच्या कुटुंबासोबत घरातच आहोत. आम्ही सर्वांना आग्रह करतो की, तुम्हीही घराबाहेर न पडता लॉकडाऊनचे पालन करा आणि कोरोनाचा प्रसार होण्यास रोखा.'