इस्लामाबाद- पाकिस्तानचा माजी सलामीवीर तौफीक उमर याने कोरोनावर मात केली आहे. उमरला गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्याला घरामध्येच क्वारंटाइन करण्यात आले होते. त्याच्यावर उपचारही सुरु होते. या उपचारांना आता त्याचा वैद्यकिय अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, कोरोनावर मात केल्यानंतर उमरने लोकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनावर मात केल्यानंतर उमरने सांगितले की, 'मे महिन्यामध्ये माझी वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. यामध्ये मला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर १४ दिवस मी घरामध्येच क्वारंटाइन होतो. मी अल्लाच्या आशिर्वादाने बरा झालो आहे. सध्याच्या घडीला मी पूर्णपणे फिट आहे. प्रत्येकाने आपली काळजी घ्यायला हवी. त्याचबरोबर कोरोना टाळण्यासाठी योग्य त्या उपाय योजनाही करायला हव्यात.'