महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पाकिस्तानच्या क्रिकेटपटूनं दिली फिक्सींगची कबुली! - नासीर जमशेद फिक्सींगची कबुली न्यूज

नासीर जमशेद पीएसएल स्पॉट फिक्सींग प्रकरणात सहकारी क्रिकेटपटूंना लाच देण्याच्या प्रकरणात दोषी आढळला आहे. नासीर व्यतिरिक्त युसूफ अन्वर आणि मोहम्मद एजाज या अन्य दोन जणांनी पीएसएल खेळाडूंना लाच दिल्याची कबुली दिली आहे. या तिघांच्या शिक्षेचा निर्णय फेब्रुवारीमध्ये होईल.

Pakistans Nasir Jamshed pleads guilty in UK bribery case
पाकिस्तानच्या क्रिकेटपटूनं दिली फिक्सींगची कबुली!

By

Published : Dec 10, 2019, 1:53 PM IST

Updated : Dec 10, 2019, 2:43 PM IST

कराची -पाकिस्तान संघाचा माजी सलामीवीर नासीर जमशेदने, पाकिस्तान सुपर लिग स्पर्धेच्या (पीएसएल) २०१६-१७ हंगामात स्पॉट फिक्सींग केल्याची कबुली दिली आहे. इंग्लंडमधील मँचेस्टर क्राऊन न्यायालयात नासीरने आपल्यावरील आरोप मान्य केले. २०१८ मध्ये त्याला १० वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

हेही वाचा -बंदी असूनही रशिया खेळू शकतो फिफा विश्वकरंडक स्पर्धेचा पात्रता सामना

नासीर जमशेद पीएसएल स्पॉट फिक्सींग प्रकरणात सहकारी क्रिकेटपटूंना लाच देण्याच्या प्रकरणात दोषी आढळला आहे. नासीर व्यतिरिक्त युसूफ अन्वर आणि मोहम्मद एजाज या अन्य दोन जणांनी पीएसएल खेळाडूंना लाच दिल्याची कबुली दिली आहे. या तिघांच्या शिक्षेचा निर्णय फेब्रुवारीमध्ये होईल.

२०१६ मध्ये झालेल्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्येही फिक्सींगचा प्रयत्न करण्यात आला होता. तर पीएसएल २०१७ मध्ये सामने निश्चित केले गेले होते. या दोन्ही प्रकरणांमध्ये नासीरने एका षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर धावा न करणायासाठी पैसे घेतले होते, असे तपासादरम्यान पोलिसांना आढळले आहे. नासीरने ९ फेब्रुवारीला दुबईच्या इस्लामाबाद युनायटेड आणि पेशावर झल्मी यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान फिक्सींगसाठी खेळाडूंना भडकवले होते.

नासीरने आपल्या कारकिर्दीत ४८ एकदिवसीय, १८ टी-२० आणि २ कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.

Last Updated : Dec 10, 2019, 2:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details