लाहोर - पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमवर एका महिलेने लैंगिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला आहे. पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीवरील पत्रकार परिषदेत या महिलेने गंभीर आरोप केले. ''बाबरने माझे १० वर्षांपासून शोषण केले. या काळात मी गरोदर होते. त्याने मला लग्न करण्याचे आश्वासन दिले होते'', असे या महिलेने सांगितले.
हेही वाचा -मांजरेकर म्हणतात, ''जडेजासारखे खेळाडू वनडेसाठी योग्य नाहीत''
ही महिला म्हणाली, "बाबर क्रिकेटपटू होण्यापूर्वीचा आमचा संबंध आहे. तो माझ्याबरोबर शाळेत होता. आम्ही शेजारी राहत होतो. २०१०मध्ये त्याने मला प्रपोज केले आणि मी त्याला होकार दिला. काही काळानंतर आम्ही लग्नाचा विचार केला. आम्ही आमच्या कुटुंबाला याची माहिती दिली. पण त्यांनी नकार दिला. म्हणून २०११मध्ये आम्ही पळून गेलो. कोर्टात लग्न करायचे, हे मला बाबरने सतत सांगितले. आम्ही अनेक भाड्याच्या घरात राहिलो. पण तो लग्नास नकार देत राहिला."
"२०१४मध्ये पाकिस्तान संघात निवड होताच बाबरचे वर्तन बदलले. दुसऱ्याच वर्षी मी त्याला लग्नाविषयी विचारले. तेव्हा त्याने नकार दिला. २०१६मध्ये मी त्याला गर्भवती असल्याचे सांगितले. तेव्हा त्याची वागणूक बदलली. त्याने माझा शारीरिक छळ केला. घरातून पळून गेलो असल्याने मी याबद्दल कुठे वाच्यता करू शकले नाही. बाबरने मला गर्भपात करण्यास सांगितले. २०१७मध्ये मी बाबर विरोधात नासिराबाद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. त्याने मला दहा वर्षांपासून त्रास दिला. त्याने मला जिवे मारण्याचीही धमकी दिली होती'', असे या महिलेने सांगितले.