महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पाक क्रिकेटपटूंना आता ४ परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी - Pakistani cricketers noc latest news

‘या नवीन धोरणानुसार केवळ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास प्रक्रियेचा अंतिम टप्पा मंजूर करण्याचा अधिकार असेल. शिवाय, खेळाडूंना प्रथमच एनओसी घेण्यासाठी थेट त्यांच्या संबंधित संघाशी संपर्क साधावा लागेल ’, असे पीसीबीने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Pakistani cricketers allowed to play in maximum 4 leagues only
पाक क्रिकेटपटूंना आता ४ परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी

By

Published : Mar 28, 2020, 7:14 PM IST

लाहोर -पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) एक नवीन ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) जाहीर केले आहे. या प्रमाणपत्रानुसार आता केंद्रीय करारामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व खेळाडूंना केवळ चार परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात येईल. यात पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल)चा देखील समावेश आहे.

‘या नवीन धोरणानुसार केवळ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास प्रक्रियेचा अंतिम टप्पा मंजूर करण्याचा अधिकार असेल. शिवाय, खेळाडूंना प्रथमच एनओसी घेण्यासाठी थेट त्यांच्या संबंधित संघाशी संपर्क साधावा लागेल ’, असे पीसीबीने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मंडळाने असेही म्हटले आहे, की जे खेळाडू पांढऱ्या चेंडूसह नियमितपणे खेळतात परंतु लाल चेंडूसह खेळत नाहीत त्यांना एनओसी मिळाल्यास ५०षटकांच्या आणि २० षटकांच्या स्पर्धा खेळणे आवश्यक आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details