इस्लामाबाद - पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याने वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटर व्हिवियन रिचर्डसन, श्रीलंकेचा सनथ जयसुर्या आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. एका यूट्युब चॅनलवर बोलताना इंझमामने रिचर्डस, जयसुर्या आणि डिव्हिलियर्स यांनी क्रिकेटमध्ये आक्रमकता, नाविन्य आणि कल्पकता आणली असल्याचं म्हटलं आहे.
इंझमाम म्हणाला की, काही वर्षांपूर्वी रिचर्डसन यांनी क्रिकेटमध्ये बदल केले. त्यावेळी फलंदाज वेगवान गोलंदाजांचा सामना बॅकफूटवर करत असतं. मात्र, त्यांनी वेगवान गोलंदाजांना फ्रंटफूटवर कसे खेळावे, हे दाखवून दिलं. तसेच त्यांनी वेगवान गोलंदाजांविरुद्धही वेगाने धावा काढत्या येऊ शकतात, हेही शिकवलं.
जयसुर्याविषयी इंझमाम म्हणाला, क्रिकेटमध्ये दुसरा बदल करणारा व्यक्ती जयसुर्या. त्याने डावाच्या पहिल्या १५ षटकात वेगाने धावा कशा केल्या जातात हे शिकवलं. तो क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याआधी, उचलून फटका मारणारा फलंदाज समजला जात नसे. पण त्याने याविचारामध्ये बदल करण्यास भाग पाडलं. तो पहिल्या १५ षटकात म्हणजेच पावर प्लेमध्ये सर्कलमधील खेळाडूंच्या डोक्यावर उचलून बेधडक फटके मारत असे.
इंझमाम पुढे म्हणाला, तिसरा खेळाडू डिव्हिलियर्स आहे. त्याला कारणीभूत एकदिवसीय आणि टी-२० आहे. असे मी मानतो. कारण एकदिवसीय आणि टी-२० मध्ये वेगाने धावा कराव्या लागतात. यात फलंदाज सरळ फटके मारण्यासाठी प्राधान्य देतात. मात्र डिव्हिलियर्स पॅडल स्वीप आणि रिव्हर्स स्वीपचे फटके मारले. त्याने क्रिकेटमध्ये केलेला हा बदल आहे.