महाराष्ट्र

maharashtra

पाकिस्तानच्या अकमलची भरारी, 'या' विक्रमात धोनीला टाकले मागे

By

Published : Oct 16, 2020, 3:56 PM IST

टी-२० क्रिकेटमध्ये १०० खेळाडूंना यष्टीचीत करणारा कामरान अकमल जगातील पहिला यष्टीरक्षक ठरला आहे. माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनी टी-२० क्रिकेटमध्ये ८४ यष्टीचीतसह दुसर्‍या क्रमांकावर आहे.

pakistan wicketkeeper kamran akmal first wicketkeeper to affect 100 t20 stumpings
पाकिस्तानच्या अकमलची भरारी, 'या' विक्रमात धोनीला टाकले मागे

लाहोर -पाकिस्तानचा यष्टीरक्षक-फलंदाज कामरान अकमल टी-२० क्रिकेटमध्ये १०० खेळाडूंना यष्टीचीत करणारा जगातील पहिला यष्टीरक्षक ठरला आहे. ३८ वर्षीय कामरानने नॅशनल टी-२० कपदरम्यान हा पराक्रम केला. मंगळवारी मध्य पंजाब आणि दक्षिण पंजाब यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने हा इतिहास रचला.

"टी-२० क्रिकेटमध्ये १०० यष्टीचीत करणारा पहिला यष्टीरक्षक. अभिनंदन कामरान अकमल. मोठी कामगिरी", असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवर म्हटले आहे. माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनी टी-२० क्रिकेटमध्ये ८४ यष्टीचीतसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. तिसर्‍या क्रमांकावर कुमार संगकारा असून त्याच्या नावावर ६० यष्टीचीत फलंदाजांची नोंद आहे.

महेंद्रसिंह धोनी

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये धोनी ३४ यष्टीचितसह (९८ सामने) अव्वल स्थानी आहे. धोनीनंतर, अकमल आहे. त्याने पाकिस्तानकडून ५८ सामन्यांत ३२ फलंदाजांना यष्टीचित केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details