इस्लामाबाद- तब्बल १० वर्षांनंतर एखादा संघ पाकिस्तानचा दौऱ्यावर पोहोचला आहे. मात्र, पाकिस्तान बोर्डासमोरील संकट काय कमी झालेली नाहीत. उभय संघांमध्ये २७ सप्टेंबरला पहिला एकदिवसीय सामना खेळणार होता. मात्र, या सामन्यात पावसाने हजेरी लावली आणि हा सामना रद्द करावा लागला. यावर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने तोडगा काढत तीन सामन्याची मालिकेसाठी खास व्यूहरचना आखली आहे.
पीसीबीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाशी चर्चा करून दुसऱ्या एकदिवसीय सामन्याची तारीख बदलली आहे. नव्या व्यूहरचनेनुसार उभय संघामधील दुसरा सामना रविवारच्या ठिकाणी सोमवारी खेळण्यात येणार आहे. दरम्यान, कराचीमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पाकिस्तान नॅशनल स्टेडियमलाही याचा फटका बसला आहे. सामना खेळण्या योग्य मैदान करण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार आहे. यामुळे पीसीसीबीने हा तोडगा काढला आहे.