लंडन -विश्वकरंडकातील आव्हान कायम राखण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला दुबळ्या अफगाणिस्तानने विजयासाठी चांगलेच झुंजवले. शेवटपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या या सामन्यात पाकने शेवटच्या षटकात ३ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह पाकचे स्पर्धेतील आव्हान कायम राहिले आहे. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या नाट्यपूर्ण लढतीत अखेर पाकिस्तानने निसटता विजय मिळवला.
PAK vs AFG : अफगाणिस्ताने पाकिस्तानला विजयासाठी झुंजवले; पाक ३ विकेट्सने विजयी - ICC Cricket World Cup 2019
हेडिंग्ले मैदानावर खेळण्यात येत असलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने निर्धारीत ५० षटकांमध्ये ९ गडी गमावत २२७ धावा केल्या होत्या.
अफगाणिस्तानच्या 228 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला चांगली सुरुवात करता आली नाही. मोहम्मद नबी, मुजीब उर रेहमान आणि रशिद अली यांनी पाकिस्तानचा अर्धा संघ गारद करत पाक संघावर दडपण आणले होते. मात्र मोक्याच्या क्षणी इमाद वसीमने नाबाद ४९ धावा करत पाकला विजय मिळवून दिला.
हेडिंग्ले मैदानावर खेळण्यात येत असलेल्या सामन्यात नाणेफक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय अफगाणिस्तानने घेतला. पण शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीपुढे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. आफ्रिदीने या सामन्यात चार विकेट्स मिळवत अफगाणिस्तानचे कंबरडे मोडले. पण असगर अफगाण आणि नजिबुल्ला झारदान यांच्या प्रत्येकी 42 धावांच्या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजी करताना 227 धावा करता आल्या.