महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

SA vs PAK: अफ्रिका दौऱ्याआधी पाकिस्तानच्या खेळाडूला कोरोनाची लागण

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघातील एक खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

Pakistan tour of South Africa : One Pakistan Cricketer Tests Positive For COVID-19 Ahead Of Tour
SA vs PAK: अफ्रिका दौऱ्याआधी पाकिस्तानच्या खेळाडूला कोरोनाची लागण

By

Published : Mar 17, 2021, 9:20 PM IST

लाहोर - दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघातील एक खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याची माहिती दिली.

पाकिस्तान बोर्डाने सांगितलं की, '१६ मार्चला संघातील ३६ सदस्यांची चाचणी करण्यात आली. यात एका खेळाडूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर उर्वरित ३५ रिपोर्ट हे निगेटिव्ह आहेत.'

ज्या खेळाडूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्या खेळाडूची गुरूवारी पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे. यात त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी त्याला लाहोरमध्ये दोन ते तीन दिवसांसाठी क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल. यानंतर त्याची पुन्हा चाचणी करण्यात येईल, असे देखील पीसीबीने स्पष्ट केलं.

दरम्यान, पाकिस्तानचा संघ आफ्रिका दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि चार टी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ २६ मार्चला जोहान्सबर्गसाठी रवाना होणार आहे.

हेही वाचा -ICC T२० Rankings : कोहलीला 'विराट' कामगिरीचे बक्षिस, राहुलला फटका

हेही वाचा -महिला क्रिकेट: पराभवाची मालिका सुरूच, पाचव्या वनडेत अफ्रिकेचा भारतावर ५ गडी राखून विजय

ABOUT THE AUTHOR

...view details