कराची- पाकिस्तान सुपर लीग शेवटच्या टप्प्यात आहे. मुल्तान सुल्तान्स आणि लाहोर कलंदर्स यांच्यात स्पर्धेचा २९ वा सामना खेळवण्यात आला. लाहोर कलंदर्सने या सामन्यात ९ गडी राखून विजय मिळवत, उपांत्य फेरी गाठली. दरम्यान, या सामन्यात, शाहीन आफ्रिदी आणि रोहैल नजीर यांच्यात मजेशीर 'टशन' पाहायला मिळाली. नजीरने आफ्रिदीच्या गोलंदाजीवर एबी डिव्हिलियर्स स्टाईलने चौकार खेचला. तेव्हा पुढच्या चेंडूवर आफ्रिदीने नजीरचा त्रिफाळा उडवत बदला घेतला. दोघांच्या टशनचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
नजीरने मुल्तान सुल्तान्स संघाच्या १८ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर आफ्रिदीला डिव्हिलियर्स स्टाईलने चौकार लगावला. तेव्हा पुढचाच चेंडू यार्कर टाकत आफ्रिदीने नजीरला त्रिफाळाचित केले. नजीरने या सामन्यात १७ चेंडूत १ षटकारासह २४ धावांची खेळी केली.