'भारताचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानचा संघ काळ्या फिती बांधणार' - काळ्या फिती
पाकिस्तान क्रिकेटच्या संघाने काळ्या फिती बांधून मैदानात उतरताना काश्मिरमध्ये भारताकडून कसे अत्याचार होत आहेत. हे सांगितले पाहिजे. पाकिस्तानचे सुचना आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी ट्वीट करताना लिहिले.
फवाद चौधरी ११११
मुंबई- पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानातील वातावरण गरम आहे. यामुळे विश्वकरंडकात भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा, अशी मागणी केली जात आहे. परंतु, आयसीसीने आंतरराष्ट्रीय स्तरावर अशाप्रकारची मागणी मान्य होवू शकत नाही, असे स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानचे सुचना आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी या पार्श्वभूमीवर ट्वीट करताना लिहिले आहे, की हे फक्त क्रिकेट नाही...मला आशा आहे, की आयसीसी खेळात चालणाऱ्या राजकारणावर कडक कारवाई करेल. भारतीय क्रिकेट संघ राजकारण करणे थांबवले नाही तर, पाकिस्तान क्रिकेटच्या संघाने काळ्या फिती बांधून मैदानात उतरताना काश्मिरमध्ये भारताकडून कसे अत्याचार होत आहेत. हे सांगितले पाहिजे. यासाठी मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आयसीसीकडे भारताची तक्रार करावी असा आग्रह करत आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यात १६ जूनला विश्वकरंडक स्पर्धेत सामना होणार आहे. भारताने पाकिस्तान विरुद्ध खेळण्याबाबत अनेक आजी-माजी खेळाडूंनी त्यांची मते मांडली आहेत.