दुबई -आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज शुक्रवारी आपली जागतिक टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत पहिल्यांदाच आयसीसीकडून तब्बल ८० देशांचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसीच्या या टी-२० क्रमवारीत भारताच्या संघाला ३ स्थानांचे नुकसान झाले असून भारतीय संघ पाचव्या स्थानी घसरला आहे.
सध्याच्या जागतिक टी-२० क्रमवारीत पाकिस्तानचा संघ २८६ गुणांसह पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर दक्षिण आफ्रिका २६२ गुणांसह दुसऱ्या आणि इंग्लंडचा संघ २६१ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.