महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारतानेच श्रीलंकेच्या खेळाडूंना धमकावलं, पाक क्रीडामंत्र्यांचा आरोप

पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी श्रीलंकेच्या खेळाडूंवर भारताने दबाव आणला, असा आरोप केला आहे. भारताकडून पाकिस्तान दौऱ्यावर जाऊ नका, असे त्यांना सांगितले जात असून जर तुम्ही या दौऱ्यातून माघार घेतली नाही तर तुमची आयपीएलमधून हकालपट्टी केली जाईल, असे त्या खेळाडूंना धमकवण्यात आले. याची माहिती मला क्रीडा समालोचकांकडून मिळाली असल्याचे चौधरी म्हणाले.

पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी..

By

Published : Sep 10, 2019, 4:31 PM IST

Updated : Sep 10, 2019, 5:29 PM IST

कराची - श्रीलंका संघातील १० खेळाडूंनी सुरक्षेचे कारण देत पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली. या दौऱ्याला २७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार होती. परंतु, लंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला. दरम्यान, याबाबत पाकिस्तानच्या एका मंत्र्यांनी अकलेचे तारे तोडत थेट भारताला जबाबदार धरले आहे.

पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी श्रीलंकेच्या खेळाडूंवर भारताने दबाव आणला, असा आरोप केला आहे. भारताकडून पाकिस्तान दौऱ्यावर जाऊ नका, असे त्यांना सांगितले जात असून जर तुम्ही या दौऱ्यातून माघार घेतली नाही तर तुमची आयपीएलमधून हकालपट्टी केली जाईल, असे त्या खेळाडूंना धमकवण्यात आले. याची माहिती मला क्रीडा समालोचकांकडून मिळाली असल्याचे चौधरी म्हणाले.

हेही वाचा -'आतंकिस्तान' मध्ये क्रिकेट खेळणार नाही, श्रीलंकेच्या खेळाडूंचा पाक दौऱ्यासाठी नकार

पुढे बोलताना चौधरी म्हणाले की, भारताकडून करण्यात येणारी कृती खेदजनक असून क्रीडा विभागापासून ते अंतराळ क्षेत्रातील स्पर्धेपर्यंत भारताच्या जळाऊ वृत्तीचा निषेध केलाच पाहिजे. भारतीय क्रीडा विभागाची ही वागणूक अत्यंत चुकीची आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा -रोहित शर्मा आला रे..! कसोटीत सलामीला येणार हिटमॅन

दरम्यान, श्रीलंकेच्या संघातील टी-२० संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा आणि माजी कर्णधार अँजलो मॅथ्यूज, दिमुथ करुणारत्ने, निरोशन डिकवेला, कुसल परेरा, धनंजय डी सिल्वा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल आणि दिनेश चंडीमल या खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे.

२००९ साली श्रीलंकेचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना लाहोर शहरात श्रीलंकन संघावर दहशतवाद्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात श्रीलंकेचे खेळाडू थोडक्यात बचावले होते. त्यानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन बंद झाले होते. अद्याप तरी श्रीलंकन खेळाडू या दौऱ्यासाठी तयार नसल्याने या दौऱ्याबाबत संभ्रम कायम आहे.

Last Updated : Sep 10, 2019, 5:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details