लाहोर - पाकिस्तानात खूप गुणवत्ता असून हा देश क्रिकेटचा ब्राझील आहे, असे मत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने मांडले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डीन जोन्ससोबत यू-ट्यूब वाहिनीवर झालेल्या चर्चेत अक्रमने ही प्रतिक्रिया दिली. जोन्स म्हणाले, की पाकिस्तानने क्रिकेटमध्ये बर्यापैकी गुणवत्ता आणली आहे.
गुणवत्तेमुळे पाकिस्तान हा 'क्रिकेटचा ब्राझील' आहे - वसिम अक्रम - wasim akram on pakistan cricket news
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डीन जोन्ससोबत यू-ट्यूब वाहिनीवर झालेल्या चर्चेत अक्रमने ही प्रतिक्रिया दिली.
गुणवत्तेमुळे पाकिस्तान हा 'क्रिकेटचा ब्राझील' आहे - वसिम अक्रम
जोन्स म्हणाले, “तुम्ही (पाकिस्तान) एक ‘टॅलेंट फॅक्टरी’ आहात. आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये म्हणायचो, की पाकिस्तानात खूप गुणवत्ता आहे, परंतु ती कशी वापरता येते यावर सर्व अवलंबून आहे. पाकिस्तानने क्रिकेटमध्ये विशेषत: वेगवान गोलंदाजीत नाविन्य आणले आहे. वकार युनूस, शोएब अख्तर आणि अब्दुल कादिर आणि मुश्ताक अहमद हे उत्तम गोलंदाज होते.”
अक्रमने जोन्सला उत्तर देताना सांगितले, की ही युवा कौशल्ये आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटचे ब्राझील आहे.