कराची -पाकिस्तानचा अष्टपैलू अब्दुल रझाक हा आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. आता रझाकने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबाबत एक वक्तव्य केले आहे. 'पाकिस्ताकडे विराटपेक्षा चांगले खेळाडू आहेत, पण बोर्डाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले', असे रझाकने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे.
'पाकिस्ताकडे विराटपेक्षा चांगले खेळाडू, पण.....' - अब्दुल रझ्झाक विराट कोहली न्यूज
रझाकने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबाबत एक वक्तव्य केले आहे. 'पाकिस्ताकडे विराटपेक्षा चांगले खेळाडू आहेत, पण बोर्डाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले', असे रझाकने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे.
'विराट कोहली हा एक महान खेळाडू आहे मात्र, तो भाग्यवानसुद्धा आहे. बीसीसीआयकडून त्याला पूर्ण सहकार्य मिळते. तो एक महान खेळाडू आहे आणि याबद्दल काही शंका नाही. बोर्डाकडून त्याला जो आदर मिळतो त्यापासून तो चांगली कामगिरी करण्यास प्रवृत्त होतो. जर पाकिस्तानी खेळाडूंनाही पाकिस्तान बोर्डाकडून असाच पाठिंबा मिळाला तर ते विराटलाही मागे टाकू शकतात. मात्र, या खेळाडूंकडे आमचे प्रशासन दूर्लक्ष करते', असे रझाकने म्हटले आहे.
यापूर्वीही रझाकने विराटची स्तुती केली होती. 'विराट एक यशस्वी फलंदाज आहे. तो वेगाने धावा जमवतो. पण, त्यांची सचिनशी तुलना करणे शक्य नाही. दोघांची फलंदाजी वेगळी आहे', असे त्याने म्हटले होते.