महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

माझे पुनरागमन संस्मरणीय ठरावे - सरफराज अहमद - sarfaraz ahmed in england tour news

सरफराजने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानकडून अखेरचा सामना खेळला होता. सरफराज म्हणाला. "मी या संधीबद्दल सकारात्मक आहे. जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी सर्वोत्तम कामगिरी करेन आणि संघात माझे स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेन."

pakistan cricketer sarfaraz ahmed wants to make his cricket comeback memorable
माझे पुनरागमन संस्मरणीय ठरावे - सरफराज अहमद

By

Published : Jun 13, 2020, 9:01 PM IST

लाहोर - पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमदचा नुकताच इंग्लंड दौऱ्यासाठी 29 जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे. आपले क्रिकेटमध्ये पुनरागमन संस्मरणीय ठरावे, अशी इच्छा सरफराजने बोलून दाखवली. पाकिस्तानला 5 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान तीन सामन्यांची कसोटी मालिका आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे.

सरफराजने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानकडून अखेरचा सामना खेळला होता. सरफराज म्हणाला. "मी या संधीबद्दल सकारात्मक आहे. जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी सर्वोत्तम कामगिरी करेन आणि संघात माझे स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेन."

तो म्हणाला, "मला संघासाठी चांगली कामगिरी करुन संस्मरणीय पुनरागमन करायचे आहे. चढ-उतार हा खेळाचा एक भाग आहे. जेव्हा मी कर्णधार होतो, तेव्हा माझा संघ कसा कामगिरी करेल याकडे माझे अधिक लक्ष होते. परंतु आता मी माझ्या कामगिरीकडे लक्ष देईन."

इंग्लंड दौरा मोठा असल्याने मोहम्मद रिझवानला पर्यायी यष्टीरक्षक म्हणून सरफराजला संघात स्थान देण्यात आल्याचे संघाचा मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हकने म्हटले होते.

सरफराज म्हणाला, "जोपर्यंत पर्यायी यष्टीरक्षकाचा प्रश्न आहे, मला याची चिंता नाही. मी पहिली किंवा दुसरी निवड आहे याचा विचार करत नाही. मी माझ्या पुनरागमनाने आनंदी आहे. दोन यष्टीरक्षक असणे संघासाठी चांगले आहे. मोईन खान आणि राशीद खान संघात असताना हे आम्ही पूर्वी पाहिले आहे."

ABOUT THE AUTHOR

...view details