नवी दिल्ली -पाकिस्तान संघाचा सलामीचा फलंदाज इमाम उल हक याचे अनेक तरुणींसोबत चॅटिंग केलेली स्क्रीन शॉट्स सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर इमामवर टीकेची झोड उठली. तेव्हा इमाम उल हकने आपल्यावरच्या सगळ्या आरोपांचा स्वीकार करत, या प्रकरणी त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे माफी मागितली आहे.
पाक खेळाडूचे तरुणींशी अश्लिल चॅटिंग; पकडला गेल्यावर रडत म्हणाला, आता नाही करणार... - online scandal
काही दिवसांपूर्वी इमाम याच्यावर एकाच वेळी अनेक तरुणींसोबत संबंध ठेवण्याचे आरोप करण्यात आले होते. तसेच इमान याने अनेक तरुणींसोबत केलेल्या चॅटिंगचे स्क्रीन शॉटही सोशल मीडियावर व्हायरल झाले. तेव्हा इमान यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली. यानंतर हे इमाम याचे खासगी असल्याचे सांगत पीसीबीने या प्रकरणी बोलण्यास नकार दिला. मात्र, सोमवारी पीसीबीचे अधिकारी वसीम खान यांनी इमान याने आपली चूक मान्य करत माफी मागितल्याचे सांगितले.

दरम्यान, इमाम हा पाकिस्तानच्या माजी कर्णधार इंझमाम उल हक याचा भाचा आहे. सद्य स्थितीत इमाम पाकिस्तान संघाचा सलामीवर फलंदाज म्हणून ओळखला जातो. नुकत्याच झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत इमान उल हक याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे तो टीकेचा धनी बनला. इंझमाम उल हक निवड समितीत असल्यामुळेच इमाम याला संघात जागा देण्यात आली, असा आरोप यापूर्वी इमाम यांच्यावर झाला आह.