नवी दिल्ली - पाकिस्तान संघाचा वेगवान खेळाडू हसन अली भारताच्या शामिया आरजूशी विवाहबंधनात अडकणार आहे. हे लग्न दुबईमध्ये 20 ऑगस्टला होणार आहे. हसन अलीने या लग्नासाठी टीम इंडियाला आमंत्रित करण्याचे ठरवले आहे.
पाकचा हसन अली टीम इंडियाला देणार लग्नाचे निमंत्रण, व्यक्त केली इच्छा - indian girl
'मला आनंदच होईल जर टीम इंडिया लग्नासाठी दुबईला येईल.' असे त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले.
![पाकचा हसन अली टीम इंडियाला देणार लग्नाचे निमंत्रण, व्यक्त केली इच्छा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4047989-280-4047989-1565003194236.jpg)
भारतीय क्रिकेट संघाला निमंत्रण देण्याची इच्छा हसन अलीने व्यक्त केली आहे. त्याने माध्यमांना बोलताना सांगितले, 'माझ्या लग्नासाठी मी भारतीय संघाला आमंत्रित करणार आहे, शेवटी आम्ही क्रिकेटमित्र आहोत. मला आनंदच होईल जर टीम इंडिया लग्नासाठी दुबईला येईल. स्पर्धा मैदानावर असते बाहेर नाही. शेवटी आम्ही खेळाडू आहोत. त्यामुळे आपण एकमेकांच्या आनंदात सहभागी व्हायला हवे.'
हरियाणाची शामिया आरजू दुबईला वास्तव्यास असते. तिचे कुटूंब नवी दिल्लीत राहते. शामियाकडे एरोनॉटिक्सची डिग्री असून ती एमिरेट्स एयरलाइन्समनध्ये फ्लाईट इंजिनीयर आहे.