लाहोर - दहशतवादी हल्ला आणि सुरक्षेच्या कारणावरुन झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजच्या संघांशिवाय कोणत्याही संघांनी पाकिस्तानचा दौरा केला नाही. यामुळे त्रस्त असलेल्या पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाला 'पाकिस्तान सुपर लीग'च्या (पीएसएल) पहिल्या दोन हंगामात मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. यामुळे पाकिस्तान मोठ्या अडचणीत सापडला आहे.
हेही वाचा -४० वर्षीय झहीर खानची मैदानात वापसी, 'या' संघासाठी करणार गोलंदाजी
इंडियन प्रीमिअर लीगला मिळालेले यश पाहून आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानने आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तान क्रिकेट लीगची सुरुवात केली. पण यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कोट्यवधींचा फटका बसला आहे.
हेही वाचा -Cricket Records: कसोटीत चिवट फलंदाज स्टीव्ह स्मिथला 'शुन्या'वर बाद करणारे ४ गोलंदाज
पीएसएलच्या पहिल्या दोन हंगामाचा लेखापरिक्षण अहवाल समोर आला आहे. यात पाकिस्तानला तब्बल २४ कोटी ८६ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. फ्रँचायझींकडून पगार देण्यात होणार विलंब, पुरवठादारांची थकलेली बिले आदींमुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाला तोटा सहन करावा लागला आहे. दरम्यान, पीएसएलची सुरूवात २०१६ मध्ये करण्यात आली. या स्पर्धेचे दोन हंगाम पार पडले असून यात दोन्ही वेळा इस्लामाबाद युनायटेडने विजेतेपद पटकावले आहे.