कराची - आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे चर्चेत असलेला पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर वादात सापडला आहे. पीसीबीवर केलेल्या गंभीर आरोपावरून अख्तरला नोटीस बजावण्यात आली आहे. अख्तरने नुकत्याच अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये पीसीबीच्या कायदा विभागाला नालायक म्हटले होते. इतकेच नव्हे तर, पीसीबीचे कायदे सल्लागार तफज्जुल रिझवी यांनाही फटकारले होते.
गंभीर वक्तव्यामुळे अख्तरला पीसीबीची नोटीस - shoaib akhtar notice latest news
पाकचा फलंदाज उमर अकमलला मिळालेल्या बंदीच्या शिक्षेवर अख्तरने मत दिले. तसेच रिझवी यांचे नाव घेऊन ताशेरे ओढले होते. “अख्तरने प्रतिक्रिया देताना चूकीचे शब्द वापरले”, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
पाकचा फलंदाज उमर अकमलला मिळालेल्या बंदीच्या शिक्षेवर अख्तरने मत दिले. तसेच रिझवी यांचे नाव घेऊन ताशेरे ओढले होते. “अख्तरने प्रतिक्रिया देताना चूकीचे शब्द वापरले”, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) लाचलुचपत प्रतिबंधक संहितेचा भंग केल्याबद्दल पाकिस्तान संघाचा फलंदाज उमर अकमलला ३ वर्षाच्या बंदीची शिक्षा दिली. अख्तरने या प्रकरणावर उघडपणे भाष्य केले. त्याने आपल्या यूट्यूब वाहिनीवर आपल्याच देशाच्या क्रिकेट बोर्डाला जोरदार फटकारले असून त्याने बोर्डाला नालायकदेखील म्हटले आहे.