लंडन- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर पाक वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने आपल्या चाहत्यांना एक भावनिक आवाहन केले आहे. तो म्हणतो, भारताविरुद्ध सामन्यात आम्ही पराभूत झालो. कृपा करून खेळाडूंविषयी अपशब्द वापरू नका. आम्ही उर्वरित स्पर्धेतील सामन्यात जिद्द आणि चिकाटीने सांघिक खेळ करू, असे सांगत आमिरने चाहत्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
भारताविरुध्दच्या पराभवानंतर पाक गोलंदाज आमिरचे चाहत्यांना भावनिक आवाहन, म्हणाला... - supporter
भारताविरुद्ध सामन्यात आम्ही पराभूत झालो. कृपा करून खेळाडूंविषयी अपशब्द वापरू नका. आम्ही उर्वरित स्पर्धेतील सामन्यात जिद्द आणि चिकाटीने सांघिक खेळ करू, असे सांगत चाहत्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन मोहम्मद आमिरने केले आहे.
भारताने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात सोशल मीडियावर पाकिस्तानच्या खेळाडूंना ट्रोल करण्यात येत आहे. काही पाकिस्तानी चाहत्यांनी तर खेळाडूंना शिवीगाळ केल्याचेही समोर आले. यामध्ये प्रामुख्याने कर्णधार सर्फराज अहमद, शोएब मलिक याच्यावर चाहत्यांचा रोष आहे. मात्र, यावर मोहम्मद आमिर हा आपल्या संघातील खेळाडूच्या मदतीला धावून आला आहे.
आमिरने एक ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो. कृपा करून खेळाडूंविषयी अपशब्द वापरू नका, मात्र तुम्ही आमच्या प्रदर्शनाविषयी बोलू शकता, आम्ही जिद्दीने खेळ करत उर्वरित स्पर्धेत चांगला खेळ करू, आम्हाला तुमच्या पाठिंबाच्या गरज असल्याचे भावनिक आवाहन आमिरने केले आहे. दरम्यान आमिरच्या ट्विटला ४ हजारहून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे. याच ट्विटला ३४ हजार लोकांनी लाईक आणि ७ हजारहून अधिक लोकांनी कमेंट केली आहे