नवी दिल्ली -पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली भारताच्या एका मुलीशी लग्न करणार आहे असे सांगण्यात आले होते. मात्र, हसन अलीने या लग्नाच्या बातमीविषयी स्पष्टीकरण दिले आहे. त्याने या लग्नाबाबत 'अजून काही खरं नाही' असे म्हटले आहे.
भारताच्या आरजूशी लग्न करण्याबाबत पाकचा हसन अली म्हणाला, 'अजून काही खरं नाही' - हसन अली
हसन अलीने यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्याने म्हटले, 'मी एका गोष्टीची येथे पुष्टी देतो की, माझ्या लग्नाबाबत अजून काही खरे नाही.
हसन अलीने यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्याने म्हटले, 'मी एका गोष्टीची येथे पुष्टी देतो की, माझ्या लग्नाबाबत अजून काही खरे नाही. आमच्या कुटुंबाची आता फक्त भेट झाली आहे आणि या विषयावर चर्चा सुरू आहे. तर काही निष्कर्ष निघाले तर नक्कीच त्याची घोषणा केली जाईल.'
या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, हरियाणाची शामिया आरजू पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. शिवाय, या लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे, असेही वृत्तपत्राने म्हटले होते. भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झाने यापूर्वी पाकिस्तानी सासर निवडले होते. पाकिस्तानी फलंदाज शोएब मलिकशी सानियाने विवाह केला आहे.