लाहोर - पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू अब्दुल रझाक आपल्या स्वैर वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतो. 'पाकिस्तानकडे विराटपेक्षा चांगले खेळाडू आहेत', असे तो यापूर्वी म्हणाला होता. आता त्याने भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागविषयी मोठे विधान केले आहे.
हेही वाचा -दुबई ओपन : सानिया मिर्झा-कॅरोलिन गार्सिया उपांत्यपूर्व फेरीत
'वीरेंद्र सेहवागला स्टार बनवण्यात पाकिस्तानची सर्वात मोठी भूमिका आहे. हे आमच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे झाले आहे. सेहवागकडे फुटवर्क नव्हते. त्याच्या बॅटचा स्विंग आश्चर्यकारक होता. त्याने मुलतानमध्ये तिहेरी शतक झळकावले. जर तुम्ही फलंदाजाचे ८ झेल सोडले तर तो ३५० धावा काढणारच. पाकिस्तान संघ नेहमीच खेळाडू घडवतो. जो कुठेही कामगिरी करत नाही तो आपल्याविरुद्ध करतो. आम्ही अँड्र्यू सायमंडला एक स्टार बनवले. भारतात खेळाडू घडवण्यात त्याच्या माध्यमांचीही मोठी भूमिका आहे. कारण तिथले मीडिया खूप शक्तिशाली आहेत', असे रझाकने एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
भारतीय क्रिकेटपटू आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत असतो -
रझाकने भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटचा दृष्टीकोन सांगितला. 'पाकिस्तानात नैसर्गिक प्रतिभा अधिक आहे. आयपीएल असल्याने भारतीय संघ चांगला खेळतो. जर ते काढून टाकले तर तेथील क्रिकेटपटू सरासरी स्तराचे आहेत. आपली व्यवस्था खराब आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत विराट कोहलीला २० कोटी रुपये मिळाले तर तो देशाला जिंकण्यासाठी खेळेल. भारतीय खेळाडू आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत आहेत. मोहम्मद आमिरने देशाकडून खेळणे सोडले', असेही रझाक म्हणाला आहे.