नवी दिल्ली - पाकिस्तान संघाचा जलदगती गोलंदाज हसन अली मंगळवारी भारताचा जावई झाला. भारतीय कन्या शामियासोबत तो विवाह बंधनात अडकला आहे. शामिया ही हरियाणाच्या नूंह भागात राहणारी असून ती आरझू एअर अमिरातमध्ये फ्लाईट इंजिनिअर म्हणून काम पाहते.
पाकिस्तान क्रिकेटर शोएब मलिकनंतर हसन अली झाला भारताचा 'जावई' - पाकिस्तानी क्रिकेटरची भारतीय पत्नी
दुबईच्या एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटलमध्ये हसन अली आणि शामिया आरझू यांचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला मोजक्याच लोकांनी हजेरी लावली होती. शोएब मलिकनंतर हसन अलीही भारताचा जावई झाला आहे.

पाकिस्तान क्रिकेटर शोएब मलिकनंतर हसन अली बनला भारताचा 'जावई'
दुबईच्या एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटलमध्ये हसन अली आणि शामिया आरझू यांचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला मोजक्याच लोकांनी हजेरी लावली होती. शोएब मलिकनंतर हसन अलीही भारताचा जावई झाला आहे.
हसन अली हा पाकिस्तान संघाचा जलदगती गोलंदाज आहे. त्याने पाकिस्तानकडून ५३ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने ८२ गडी बाद केले आहेत. तसेच हसनने ९ कसोटी सामन्यात ३१ गडी बाद केले आहेत. ३० टी-२० सामन्यामध्ये खेळताना हसनने ३५ गडी बाद केले आहेत.