मुंबई - दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात चार सामन्याची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. यातील पहिला सामना शनिवारी पार पडला. यात पाकिस्तानने ४ गडी राखून विजय मिळवला. हा विजय पाकिस्तानचा टी-२० क्रिकेटमधील १०० वा विजय आहे. हा एक विश्वविक्रम आहे.
पाकिस्तान संघाने आतापर्यंत १६४ टी-२० सामने खेळली आहेत. यात त्यांनी १०० विजय मिळवले आहेत. तर ५९ सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. या यादीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत १४२ टी-२० सामने खेळली आहेत. भारताने यात८८ विजय मिळवले आहेत. तर ४७ सामन्यात भारताचा पराभव झाला आहे.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ या यादीत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहेत. या तिन्ही संघांनी प्रत्येकी ७१ विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या १३६ सामन्यात ७१ विजय तर ६० सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. न्यूझीलंडचे १४५ सामन्यात ७१ विजय तर ६२ पराभव झाले आहेत. आफ्रिकेच्या १२८ सामन्यात ७१ विजय तर ५५ पराभव आहेत.