नवी दिल्ली -पाकिस्तान क्रिकेट संघाचा फलंदाज आसीफ अलीची २ वर्षाची मुलगी नूर फातिमाचे कॅन्सरमुळे निधन झाले आहे. नूर फातिमाला चौथ्या स्टेजचा कॅन्सर झाला होता.
पाक फलंदाज आसीफ अलीच्या २ वर्षीय मुलीचे कर्करोगाने निधन - daughter
इस्लामाबाद युनायटेड संघाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या वृत्ताला दुजोरा दिला आहे
अमेरिकेत एका हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू असताना तिने अखेरचा श्वास घेतला. आसिफचा पाकिस्तान सुपर लीगमधील (PSL) संघ इस्लामाबाद युनायटेडने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
आसीफ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून तो ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी पाक संघाचा भाग होता. या दौऱ्यावर त्याने ४ सामने खेळताना २ अर्धशतकांच्या जोरावर १४२ धावा केल्या आहेत. त्याच्या या कामगिरीनंतर त्याची पाकिस्तनाच्या विश्वचषकासाठीच्या संघात निवड करण्यात आली आले आहे.