लंडन - इंग्लंड आणि पाकिस्तान संघात आजपासून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होत आहे. आजचा हा सामना ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जाईल. या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानने १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात माजी कर्णधार सरफराज अहमदला स्थान देण्यात आले आहे. हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल.
सामन्याच्या आदल्या दिवशी पत्रकारांशी बोलताना पाकिस्तानच्या कसोटी संघाचा कर्णधार अझर अलीने संघाची घोषणा केली. २०१९पासून कसोटी क्रिकेटमध्ये ब्रेक घेतलेल्या वहाब रियाजने अलीकडेच खेळाच्या लांबलचक स्वरूपासाठी स्वतः ला उपलब्ध असल्याचे जाहीर केले होते. पण त्याला संघात स्थान मिळालेले नाही.