मुंबई - झिम्बाब्वेचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने झिम्बाब्वेचा २६ धावांनी पराभव केला. या सामन्यात पाकने विजय मिळवला असला तरी त्यांचे चाहते संघाला ट्रोल करत आहेत. नेमके काय आहे प्रकरण जाणून घ्या...
पाकिस्तान-झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यात पाकने प्रथम फलंदाजी केली. फलंदाजीदरम्यान इमाम-उल-हक ५८ धावांवर धावबाद झाला. तो ज्या पद्धतीने बाद झाला त्यावरून सोशल मीडियावर चाहत्यांनी पाक संघाचा चांगलाच समाचार घेतला आहे.
काय घडले?
डावातील २६वे षटक फेकण्यासाठी सिंकदर रजा आला. त्याच्या षटकातील पाचव्या चेंडूवर इमाम उल हकने चेंडू टोलावला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या हॅरिस सोहेलने धाव घेण्यासाठी प्रयत्न केला. जेव्हा इमामने पाहिले सोहेल धाव पूर्ण करण्यासाठी येत आहे. तेव्हा दोन्ही फलंदाज एकाच क्रिजकडे धावले.
या घटनेनंतर चाहत्यांनी पाक संघाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, पाकने झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. उभय संघातील दुसरा सामना उद्या रविवारी (ता.१) रावळपिंडी येथे खेळला जाणार आहे.
हेही वाचा -DC vs MI : मुंबईचा नाद नाय करायचा.. दिल्लीवर ९ गडी राखून विजय
हेही वाचा -दोन सामन्यांत शिखर धवन ठरला गोल्डन आणि सिल्वर डक; दोन शतक झळकावल्यानंतर हरवला फार्म