कराची- श्रीलंका विरुध्दच्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा भरवशाचा फलंदाज बाबर आझमने शतक ठोकत एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला. महत्वाचे म्हणजे, बाबरने भारतीय कर्णधार विराट कोहलीला पाठीमागे टाकत हा खास विक्रम केला आहे. लंकेविरुध्दच्या शतकानंतर बाबर सर्वात कमी सामन्यांमध्ये ११ शतके ठोकणारा,
आशिया खंडातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.
पाकिस्तानमध्ये श्रीलंका विरुध्द यजमान पाकिस्तान संघामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगली आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर आज खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत ५० षटकात ७ बाद ३०५ धावा केल्या. यात बाबर आझमने १०५ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ११५ धावांची खेळी केली. बाबरचे हे ११ वे शतक आहे.